Mahadbt Farmer List : महाडीबीटी पोर्टलवर कृषी योजनांची लाभार्थी यादी पहा ऑनलाईन

Mahadbt Farmer List : महाडीबीटी पोर्टलवर कृषी योजनांची लाभार्थी यादी पहा ऑनलाईन

Mahadbt Farmer List : शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या राज्य शासनासह केंद्र शासनाच्या सर्वच्या सर्व कृषी योजना या महाडीबीटी फार्मर पोर्टलच्या (Mahadbt Portal) माध्यमातून राबवल्या जात आहेत. यास पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेल्या बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचे थकीत अनुसलेलं अनुदान हे आता राज्य शासनाच्या माध्यमातून वितरणास सुरुवात झाली आहे.

शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते की,महाडीबीटी योजनांचा लाभ मिळत नाही. गावामध्ये तर लाभार्थी पात्र होत नाही किंवा अशा प्रकारच्या योजनांचा लाभच दिला जात नाही किंवा हे अनुदान येत नाही. तर तुम्हीही गावात कुणाला अनुदान मिळालं? कोण पात्र झालं? हे ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर सुद्धा पाहू शकता. Mahadbt Farmer List

अशा सोप्या पद्धतीने पहा ऑनलाईन यादी.

सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलवरआल्यानंतर लॉगिन करायचा आहे.

लॉगिन केल्यानंतर डाव्या बाजूला अर्जाची सद्यस्थिती तपासा, लॉटरी यादी आणि निधी वितरित लाभार्थी यादी असे तीन पर्याय दिसून येतील. Mahadbt Farmer List

ज्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचा वितरण झालेला आहे, जे लाभार्थी योजनेचे अंतर्गत पात्र आहेत.

अशा लाभार्थ्यांची यादी देखील पाहता येते, यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे काही पर्याय दिसणार आहेत.

यामध्ये सर्वात प्रथम जिल्हा निवडण्याचा पर्याय आहे. आपला जिल्हा निवडून त्यानंतर तालुका, गाव निवड करायचा आहे. गाव निवडल्यानंतर आपल्या गावाची यादी रिफ्लेक्ट होईल, यातून आपले गाव निवडायचे आहे. समजा गाव निवडल्यानंतर यामध्ये किती लाभार्थी पात्र आहेत? याची मागील काही वर्षांची यादी आपल्याला पाहता येईल. तसेच सर्वात शेवटी 2024 25 या वर्षातील देखील लाभार्थी पात्र झालेले शेतकरी त्यांचीही नाव आपल्याला पाहता येतील. किती तारखेला अनुदान क्रेडिट झाला आहे? शिवाय कुठल्या बाबीसाठी हे अनुदान मिळाला आहे, ही माहिती देखील नमूद करण्यात आलेली दिसून येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *